इन्सुली हनुमान मंदिरात 5 व 6 रोजी धार्मिक कार्यक्रम

⚡बांदा ता.०३-: इन्सुली क्षेत्रफळवाडी येथे हनुमान जयंती निमित्त येथील हनुमान मंदिर येथे 5 व 6 रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने 5 रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून स्थानिकांची भजने, दिनांक 6 रोजी सकाळी 7 वाजता हनुमान जन्मोत्सव, 9 वाजता सत्यनारायण महापूजा, महाआरती व दुपारी महाप्रसाद,सायंकाळी 4 वाजता महिलांसाठी हळदीकुंक समारंभ,तर रात्री 9 वाजता नाईक दशावतार नाट्यमंडळ झरेबांबर दोडामार्ग यांचा कुंडभैरव हा नाट्यप्रयोग होणार आहे.

या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ,तरुण युवक मंडळ, महिला मंडळ व क्षेत्रफळ ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page