कुणकेरी उपरलकर देवस्थान परिसरात आग…

शेतकऱ्याच्या काजू बागा जळून खाक.;मोठे नकसान

⚡सावंतवाडी ता.०३-: कुणकेरी उपरलकर देवस्थान परिसर जंगल ते जंगल भागात लागलेल्या आगीत 8 ते 10 शेतकऱ्यांच्या काजूबागा होरपळून गेल्या. शेतकऱ्यांनी आपल्या परीने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सदरची आग समाजकंटकाकडून फॉरेस्ट परिसरामध्ये लावण्यात आली ही आग फॉरेस्टच्या भागातून शेतकऱ्यांच्या खाजगी काजू बागेमध्ये पसरली दुपारच्या वेळी लागलेली आगिने रौद्र रूप धारण केले यात आठ ते दहा शेतकऱ्यांच्या बागा होरपळून गेल्या. फॉरेस्ट कडे या संदर्भात कुठल्याही प्रकारे पर्याय उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली

You cannot copy content of this page