“सावरकरांची गौरव यात्रा नसून ती अपमान यात्रा”

संदेश पारकर यांची आम.नितेश राणे यांच्यावर टीका

⚡कणकवली ता०३-: महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरव यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर काढली जात आहे. आणि कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्याकडे सावरकर गौरव यात्रेची जबाबदारी देण्यात आली आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे.

पारकर म्हणाले, भाजपचे नेते नितेश राणे हे स्वाभिमान पक्षातून भाजपमध्ये गेल्यानंतर वीर सावरकरांच्या नावाने आता जिल्ह्यामध्ये गौरव यात्रा काढत आहेत आहे. वीर पुरुषांचा अपमान करणारे नितेश राणे आता त्या ठिकाणी गौरव यात्रा काढतायेत खरंतर हे लोकशाहीचं दुर्दैव आहे. सरड्यापेक्षा रंग बदलणारे या पद्धतीने काम सुरू आहे. जनता त्यांच्या नेतृत्वावर कधीही विश्वास ठेवणार नाही ज्यांनी भारतीय जनता पार्टीला शिव्या दिल्या आणि वीर सावरकरांचा अपमान केला आणि त्यांची गौरव यात्रा काढून जनतेची दिशाभूल करण्याचे काम नितेश राणे करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता खुळी नाही.ज्या पद्धतीने तुम्ही राजकारणामध्ये काम करताय त्या विरोधामध्ये जनता आहे. म्हणून तुम्ही कितीही गौरव यात्रा काढण्याचा प्रयत्न केला तरी ती गौरव यात्रा नसून ती सावरकरांची अपमान यात्रा असेल, भाजपचे हे नेतृत्व आहे हे लोकांना वेटीस धरणारे नेतृत्व आहे. आम्ही शिवसेना म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ,खास.विनायक राऊत आणि आम.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कायम रस्त्यावर उतरू असे प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी केले.

You cannot copy content of this page