भोसले स्कूलच्या विद्यार्थ्यांचा डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार…

⚡सावंतवाडी ता.०३-: येथील शिवसंस्कार संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिवचरित्र स्पर्धेमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत बक्षीसे मिळवली. यामध्ये सातवीतील गंधार प्रदीप जोशी याने प्रथम, आठवीतील निधी मंदार सातावळेकर हिने द्वितीय तर आठवीतील श्लोक संदीप चांदेकर व पाचवीतील मानस निलेश पाटकर यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळवला._

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते रवींद्र भवन, साखळी येथे सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई व मुख्याध्यापक व्यंकटेश बक्षी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page