आ वैभव नाईक, सतीश सावंत, संजय पडते, संदेश पारकर, सुशांत नाईक यांची उपस्थिती
ओरोस ता.०३-:रक्त पिशवी दर 450 वरून 1150 केलेल्या दरवाढी विरोधात युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली आमदार वैभव नाईक , शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत, संजय पडते, संदेश पारकर, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, नीलम सावंत यांच्या उपस्थितीत हजारो युवासैनिकांनी सिंधुदुर्गनगरी येथे घंटानाद केला.
यावेळी युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके,देवगड तालुकाप्रमुख फरीद काझी यांच्यासह असंख्य शिबसैनिक सहभागी होत्र.यावेळी 50 खोके एकदम ओके, रक्तपिपासू सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय आदी घोषणा दिल्या. हजारोंच्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांच्या मोर्चाने रक्त पिशव्यांचे दर कमी करा अशी मागणी करत शिवसैबिकांचा मोर्चा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयावर धडकला. सिव्हिल सर्जन ना रक्त पिशवी शुल्क कमी करण्याचे निवेदन देण्यात आले. तसेच रक्तदान करत शिवसैनिकांनी वाढीव रक्तदराचा निषेध केला.
