⚡बांदा ता.०३-: शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून निगुडे मुख्य रस्ता ते देवी माऊली मंदिर रस्त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. भविष्यात निगुडे गावासाठी मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून भरघोस निधी देऊ असे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी सांगितले.
निगुडे मुख्य रस्ता ते माऊली मंदिर रस्ता डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे उद्घाटन करताना श्री. दळवी बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख नारायण राणे, शिवसेना इन्सुली विभागप्रमुख राजन परब, सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन राजन रेडकर, पप्पू सावंत, निगुडे शाखाप्रमुख सिद्धिविनायक गावडे, महिला शाखाप्रमुख शर्मिला नाईक, तसेच निगुडे माजी सरपंच शांताराम गावडे, समीर गावडे, ग्रा.पं. सदस्य रवींद्र गावडे, माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, शिवा कृष्णा सावळ, गौरवी गावडे, पंढरीनाथ राणे, सुधीर गावडे, जीजी गावडे, ममता नाईक, देवस्थान समिती अध्यक्ष सत्यवान राणे, नवरात्र उत्सव समिती अध्यक्ष नारायण राणे, विलास सावंत, नारायण गावडे, संदीप नाईक, दीपक गावडे, अरविंद नाईक, पुरुषोत्तम गावडे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निगुडे माऊली मंदिर रस्त्याचे उद्घाटन
