एल आय सी विमा प्रतिनिधी विजय गोलटकर यांचे निधन

मालवण दि प्रतिनिधी

मूळ मालवणचे रहिवासी आणि मुंबई दहिसर येथील एल. आय. सी विमा प्रतिनिधी विजय गणपत गोलतकर (वय ५४) यांचे नुकतेच निधन झाले.

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. विजय गोलतकर हे मनमिळावू स्वभावाचे होते त्यांचा मित्र परिवार दांडगा होता. एल. आय. सी विमा प्रतिनिधी म्हणून त्यांनी चांगली सेवा बजावली होती. २९ एप्रिल रोजी दहिसर मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी ह्रदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, तीन बहिणी, मेहुणे असा परिवार आहे. मालवण भरड येथील निलेश कोल्ड्रिंक हाऊसचे मालक निलेश गवंडी यांचे ते भावोजी होत.

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटना व मित्र परिवाराने विजय गोलतकर यांच्या आयोजित शोकसभेत श्रद्धांजली अर्पण केली यावेळी मालवण कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकूर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सुधीर धुरी, अनिल न्हीवेकर, विजय भोजने, प्रफुल्ल देसाई, सेवानिवृत्त प्रा. आर. एन. काटकर तसेच प्राध्यापक वर्ग,आणि मित्र परिवार उपस्थित होता.

You cannot copy content of this page