भिरवंडे येथील गणपती मंदिर
ते मुरडवेवाडी रस्त्याचा सर्व्हे

⚡कणकवली ता.०१-: भिरवंडे येथील गणपती मंदिर(फटकुर माळी)ते मुरडवेवाडी रस्त्याचा सर्व्हे करण्यात आला, हे अंतर ३किलोमीटर व ३००मीटर असून मुख्यमंत्री सडक योजना यातून घेण्यात आले आहे.यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने तात्काळ मान्यता देवून निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.यासाठी आम.नितेश राणे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी विशेष प्रयत्न केले.सर्व भिरवंडे ग्रामस्थांना विश्वासात घेवून व त्याच्या सूचनांचा विचार करून हे काम केले जाईल.तसेच रामेश्वर मंदिराच्या समोर काँक्रिट रस्ता करण्याचा प्लॅन आहे.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवसेना महिंद्र सावंत , भिरवंडे ग्रामपंचायत सरपंच नितीन सावंत,प्रकाश घाडीगावकर,सुनील सावंत,कांता सावंत,दाजी दळवी, संतोष सावंत ,विजय पटेल विनय सावंत, सर्व्हे टीम व ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page