मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुका मराठा उत्कर्ष मंडळाचे सचिव तथा पंचायत समितीचे माजी सभापती रमेश पालव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ५ एप्रिल रोजी सकाळी १०:३० वाजता येथील नगरवाचन मंदिर येथे शोकसभेचे आयोजन केले आहे. पालव हे काँग्रेसचे जुन्या काळातील निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांनी पाच वर्षे मालवण तालुका पंचायत समितीचे सभापतीपदही भूषविले होते. या शोकसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष उदयराव मोरे यांनी केले आहे.
