आठवडा बाजार हलविण्यास भाजपचा विरोधच

जनमत असेल त्या बाजूने भाजप राहणार;माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले स्पष्ट

⚡सावंतवाडी ता.३१-: येथील आठवडा बाजार बाबत जी जनतेची मागणी असेल तिच भाजपची भूमिका असेल. त्यामुळे आठवडा बाजार हलविण्याबाबत हालचाली केल्या तर आम्ही त्याला लोकशाही मार्गाने विरोध करू, असा इशारा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिला.

दरम्यान केसरकरांनी जनतेचे जनमत घ्यावे. त्यानंतरच बाजार हलवण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा बाजार हलिवल्यास भाजप तीव्र विरोध करणार असे परब म्हणाले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

You cannot copy content of this page