सावरकर गौरव यात्रा ३ एप्रिल रोजी सावंतवाडी मतदार संघात

जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती;
हिंदू संघटनांनी सहभागी होण्याचे केले आवाहन

सावंतवाडी ता.३१-: राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टिकेवरून राज्यात तिव्र संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे शिवसेना व भाजप प्रदेश कडून राज्याभर स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 3 तारीखला सायंकाळी 4 वाजता या यात्रेला सुरूवात होणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली.

दरम्यान या यात्रेमध्ये हिंदू संघटनेने एकत्र येऊन या रॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ही श्री तेली यांनी यावेळी केले आहे.

यावेळी शिंदे गट जिल्हाप्रमुख अशोक दळवी,माजी नगराध्यक्ष संजू परब,जिल्हा बँक संचालक महेश सारंग,जिल्हा बँक संचालक रवि मडगावकर,माजी नगरसेवक मनोज नाईक,माजी नगरसेवक आनंद नेवगी, एकनाथ नाडकर्णी,बंडा सावंत ,आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page