टी बी मुक्त भारत अभियान अंतर्गत मातृत्व वरदान फाऊंडेशन आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ यांचे आयोजन
⚡मालवण ता.३०-: केंद्र सरकारने प्रधानमंत्री टी बी मुक्त भारत अभियानाच्या कोरडा आहार फूड बास्केट योजनेअंतर्गत मातृत्व वरदान फाउंडेशन व पर्यटन व्यावसायिक महासंघ आयोजित क्षय रुग्णदत्त योजनेचा १७ रोजी शुभारंभ करण्यात आला.
यावेळी अविसामंत, रविकिरण तोरस्कर, दादा वेंगुर्लेकर, मनोज खोबरेकर, कैसर पठाण, मंगेश वाक्कर, मिलिंद झाड, दादू डिचोलकर, गौरव लुडबे, यांच्यामार्फत शहर रुग्णांना निक्षय मित्र योजनेअंतर्गत दत्त घेण्यात आले. यावेळी मातृत्व वरदान फाउंडेशनच्या संयोजक महिमा मेहकर, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक मनोज कुमार मालंडकर, अमित सोनवडेकर, सागर मलिये, तसेच अन्य स्थानिक नागरिक उपस्थित होते.
यावेळी नीक्षय मित्र व क्षय रुग्ण दत्त योजनेची संकल्पना महासंघाकडून मांडण्यात आली. यावेळी मालवण तालुक्यातील रुग्णांना दत्त घेण्यात आले आहे. यावेळी डॉक्टर शामराव जाधव यांच्याकडे ११ रुग्णांसाठी फूड बास्केट फाउंडेशन अध्यक्ष वैष्णवी मोंडकर यांच्यामार्फत सुपूर्द करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व क्षय रुग्णांना टप्प्याटप्प्याने सदर योजनेअंतर्गत दत्तक घेण्याचा मातृत्व वरदान फाउंडेशनचा उद्देश असून शहर रुग्णांसाठी बनविलेल्या फूड बास्केटमध्ये तांदूळ, चणे, मूग, मटकी, गहू, पीठ, शेंगदाणा, गुळ, दूध पावडर, खाद्यतेल यांचा समावेश करण्यात आला आहे. क्षय रुग्णाला हा कोरडा आहार दिला जाणार आहे. सदर आहार कुठलीही एक वस्तू अथवा संपूर्ण फूड बास्केटच्या माध्यमातून व्यक्ती, सहकारी संस्था, वैयक्तिकरित्या क्षय रुग्णांना सहाय्य करून निक्षय मित्र बनू शकतो. या योजनेत फाउंडेशनच्या माध्यमातून सहभाग झालेल्या घालण्यांना टॅक्स बेनिफिटही प्राप्त होऊ शकतो.
