एसटी विभागीय कार्यशाळेच्या स्क्रॅप यार्ड जवळ आग लागून नुकसान

नगरसेवक सुशांत नाईक यांची घटनास्थळी धाव

⚡कणकवली ता.३०-: कणकवली एसटी विभागीय कार्यशाळेच्या संरक्षण भिंती लगतच्या सुक्या गवताला गुरुवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास अचानक आग लागून स्क्रॅप यार्ड मधील दहा-बारा फिल्टर व एक फॅन असे साहित्य जळून १५०० रुपयाचे नुकसान झाले आहे. येथील कर्मचाऱ्यांनी लागलेली आग तात्काळ विझवून आटोक्यात आणली. कणकवली एसटी विभागीय कार्यशाळेचे मेकॅनिकल इंजिनिअर संदीप विष्णू पाटील यांनी याबाबतची खबर कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.दरम्यान या बाबतची माहिती मिळताच नगरसेवक सुशांत नाईक यांनी घटनास्थळी जात पाहणी केली.

You cannot copy content of this page