संदेश पत्रांमधुन त्या व्यक्ती भेटल्याचा आनंद

हास्यसम्राट फेम प्रा. अजीतकुमार कोष्टी यांचे गौरोदगार

⚡कणकवली ता.२९-: निकेत पावसकर यांच्या अनोख्या छंदाने भारावून गेलो. जागतिक पातळीवर या संदेश पत्रांचे प्रदर्शन भरावे. या पत्रांमधुन अनेक नामवंत व्यक्ती प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद मिळाला, असे गौरोदगार झी मराठी वाहिनीवरील हास्यसम्राट फेम प्रा. अजितकुमार कोष्टी यांनी काढले. तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अनोख्या अक्षरघराला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. 

प्रा. अजितकुमार कोष्टी यांची हास्यसम्राट या कार्यक्रमातील विनोदी एकपात्री कार्यक्रम संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत. विशेषत: त्यांचा गण्या हे पात्र अनेकठिकाणी विनोदाची बरसात करते. तर झी टॉकीज वाहिनीवरील तडका या कार्यक्रमात हास्याचे फवारे उडवीले आहेत. एका कार्यक्रमानिमीत्त तळेरे येथे आले असता त्यांनी या अक्षरघराला भेट दिली. 

विद्यार्थ्यांना आवाहन (चौकट)

यावेळी कोष्टी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी यातून बोध घेउन आपल्या आवडीचा छंद जोपासावा आणि छंदातून आपले नाव जागतिक पातळीवर घेऊन जावे.
तसेच, भारतीय हवाई दलातील निवृत्त सार्जंट केदार मातोंडकर यांनीही या अक्षरघराला भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी सुर्यकांत तळेकर उपस्थित होते. यावेळी या संग्रहाची प्रशंसा करताना केदार मातोंड़कर म्हणाले की, तुला भेटून एका आगळ्यावेगळया छंदाचा सुगावा लागला. हा छंद जोपासण्यासाठी तुझ्या अथक प्रयत्नांना व ध्यासाला सलाम. यावेळी सतिश मदभावे, सौ. श्रावणी मदभावे, नरहरी पावसकर, सौ. सुनयना पावसकर, सौ. नेत्रा पावसकर उपस्थित होते. 
यावेळी अक्षरोत्सव परिवाराकडून अजितकुमार कोष्टी आणि केदार मातोंड़कर यांना भारतीय पोस्ट कार्ड़वरील शुभेच्छा पत्र देऊन गौरविण्यात आले. 

You cannot copy content of this page