उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांची दीपक केसरकर यांच्यावर टीका
⚡सावंतवाडी ता.२९-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे निर्दयी, हेकेखोर मंत्री आहेत त्यांना जनतेच्या सुखदुःखाचे काही देणे घेणे नाही त्यामुळे ते आठवडा बाजार हलवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र आठवडा बाजार हलवण्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा ठाम विरोध राहील असे ठाकरे गटाचे
उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी स्पष्ट केले
कासार म्हणाले,केसरकर तुम्ही जो आठवडा बाजार चार चार ठिकाणी भरवण्याचा जो निर्णय घेतला आहे. तेव्हा तुम्ही स्थानिक व्यापारी नागरिक यांचा विचार केला आहे काय? स्थानिक व्यापारी हे आपल्या उदरनिर्वाहासाठी बँका ,वित्तीय संस्था यांच्याकडून हात उसनी रक्कम घेऊन कसेबसे आपले व्यवसाय चालवत आहेत. आता काही व्यापाऱ्यांना तर बँकांची हप्ते भरणे सुद्धा जमत नाही. अशावेळी त्यांचे संसार, मुलाबाळांचे शिक्षण आहेच. आजची एकंदरीत बाजारातील ये-जा किती प्रमाणात मंदावली आहे हे आपल्याला ज्ञात आहे काय ?
फक्त राजकारण करून आपली पोळी भाजून घेणे याचा जर प्रत्येक राजकारणाचा आणि आपला उद्देश असेल तर व्यापारी ,सर्वसाधारण नागरिक यांनी कोणाकडे पहावे ? आजची दर दिवशी वाढत असलेली महागाई सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. केसरकर शेठ आपल्यासारखी लोकांची पद नाहीत ,याचाही आपण कधीतरी विचार करावा .त्यामुळे राजकारण जरा बाजूला ठेवून सावंतवाडीतील बाजार कसा व्यवस्थित राहील व त्या बाजाराने नागरिकांचा, व्यापारांचाही फायदा होईल, त्यांच्या उद्योगधंद्याला कशी चालना मिळेल हे पहावे.
तसेच आपण जे मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल बाबत जी लोकांची दिशाभूल करत आहात ती बंद करावी. ते हॉस्पिटल कधी ते होईल? परंतु जे सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालय आहे,ते तरी लोकांना सर्व सुविधा करून उपलब्ध करून द्यावेत. आणि हेही जमत नसेल तर आपली चालू असलेली खोटारडी आश्वासने बंद करावेत .जे आपण सावंतवाडी बस डेपोसाठी शासन दरबाराकडून नवीन सहा गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत, त्यांच्या आपण उद्घाटन करून आपल्याला आनंदाची भरती आली आहे ते ठीक आहे ,परंतु ज्या डेपोतील गाड्या मोडकळीस आलेल्या आहेत त्या ये-जा करून रस्त्यावर बंद पडून लोकांचे हाल होत आहेत त्याही सुव्यवस्थेत करणे आपले कर्तव्य आहे. हे आपण लक्षात घ्यावे अन्यथा मेलेल्यांच्या टाळू वरती लोणी खाण्याचे बंद करावे अन्यथा तुम्हाला जनता माफ करणार नाही. आठवडा बाजार अन्यत्र हलवण्याला शिवसेनेचा ठाम विरोध राहील या संदर्भात प्रांताधिकारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येईल बाजार आहे त्या ठिकाणी मोती तलावाकाठी भरवण्याची आमची मागणी आहे त्यावर आम्ही ठाम आहोत आज सावंतवाडी शहरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर असताना केसरकर नको असलेले प्रश्न उरकून काढत आहेत वास्तविक त्यांनी पाणीटंचाईचा प्रश्न सोडवणे सद्यस्थितीत आवश्यक आहे परंतु नको ते राजकारण ते करीत आहेत यातून त्यांचा स्वार्थ दिसत आहे असेही कासार म्हणाले.
