पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर खरेदीसाठी निधी द्या

भाजपच्या संजू शिरोडकर यांची मंत्री चव्हाण, केसरकर यांच्याकडे मागणी

⚡सावंतवाडी ता.२८-: येथील शहरांमध्ये फेब्रुवारी ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बऱ्याच भागांमध्ये पाणीटंचाई भासते त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो यापूर्वी सावंतवाडी नगर परिषदेच्या अग्निशामक बंबाच्या गाडीमार्फत पाणीपुरवठा केला जायचा, सध्या स्थितीमध्ये सावंतवाडी नगर परिषदेच्या नवीन अग्निशम बंब दाखल झालाय परंतु शासनाच्या नवीन निकषाप्रमाणे नवीन बंबाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाऊ शकत नाही त्यामुळे शहरांमध्ये पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही त्यामुळे तात्काळ शहरांमध्ये पाण्याचा टँकर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भाजप माजी शहर अध्यक्ष संजू शिरोडकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की सध्या सणासुदीचे दिवस व लग्न सराईचे दिवस आहेत. या कारणास्तव आपण प्राधान्याने तातडीची गरज म्हणून स्टेनलेस स्टील बॉडी असलेला किमान 5000 लिटर पाणी पुरवठा करण्याची क्षमता असलेला वॉटर टँकर सिक्स व्हिल सहा चाकी गाडीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून शहरवासीयांना पाणीपुरवठा नगरपरिषद्वारे होऊ शकेल, असेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

You cannot copy content of this page