आ नाईक यांच्यासाठी श्री देव रामेश्वर मंदिरात लघुरुद्र

उद्धव ठाकरे गटाकडून आयोजन;
निरोगी व दीर्घ आयुष्याची केली प्रार्थना

मालवण (प्रतिनिधी)

कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण देऊळवाडा येथे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मालवण तर्फे लघुरुद्र करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक यांना चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभो व येणाऱ्या संकटाना मात करण्याची ताकद देवो, अशी प्रार्थना रामेश्वर चरणी उपस्थित शिवसैनिकांकडून करण्यात आली.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी शहरप्रमुख नंदू गवंडी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, महीला उपजिल्हा संघटक सौ. सेजल परब, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, तपस्वी मयेकर, ज्योती मयेकर, नंदा सारंग, संमेष परब, उमेश मांजरेकर, आकांशा शिरपुटे, निना मुंबरकर, मनोज मोंडकर, मोहन मराळ, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, बाबू वाघ, महेंद्र म्हाडगुत, हेमंत मोंडकर, किशोर गावकर, उमेश चव्हाण, दत्ता पोईपकर, नाना नाईक उपस्थित होते.

You cannot copy content of this page