⚡कणकवली ता.२६-: भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी
जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या ४९ वा वाढदिवसच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये २८ व २९ मार्च रोजी १५१ गरीब वृध्दांना मोफत ज्योतिबा, नरसोबाचीवाडी, महालक्ष्मी, पंढरपूरवारी दि. १,२,३ एप्रिल रोजी भव्य दिव्य अंडरआर्म, नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा प्रथम क्रमांक – १२०००/- व ५ फुटी चषक, द्वितीय क्रमांक – ८०००/- व ४ फुटी चषक , तृतीय क्रमांक – ५०००/- व ३ फुटी चषक, चतुर्थ क्रमांक ३०००/- व २ फुटी चषक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, फलंदाज, गोलंदाज, शिस्तबद्ध संघ अशी पारितोषिक देण्यात येणार आहेत.
२ एप्रिल रोजी सकाळी ९ वा
रक्तदान शिबिर, दुपारी २ वा कनेडी बाजारपेठ , सांगवे येथे महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून महिलांनी तांदळा पासुन पदार्थ तयार करून आणून त्याची मांडणी करायची आहे. दुपारी ४ वा. होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना प्रथम क्रमांक – फ्रिज , द्वितीय क्रमांक – वॉशिंग मशिन, तृतीय क्रमांक – गॅस शेगडी, ४ ते १०क्रमांकाना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. तसेच सर्व उपस्थितांना मोफत लकी ड्रॉ ही आयोजित करण्यात आला आहे.
३ एप्रिल रोजी सकाळी १० संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा वाढदिवस व शुभेच्छा कार्यक्रम, सकाळी ११ वा. भिरवंडे वृध्दाश्रम येथे फळे व खाऊ वाटप, दु. १२ करंजे मतिमंद विद्यालय येथे खाऊ व पोषण आहार साहित्य वाटप,दुपारी ३ सिंधुरत्न टॅलेन्ट सर्च परीक्षा रिझल्ट जाहीर, क्रिकेट स्पर्धा अंतिम सामना, हिंदी मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम होणार आहेत.
तरी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन माजी अध्यक्ष जि प सिंधुदुर्ग संजना संदेश सावंत यांनी केले आहे. अधिक माहतीसाठी श्री प्रफुल काणेकर, संजय उर्फ बाबू सावंत, विजय भोगटे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पाक कला आणि होम मिनिस्टर स्पर्धेच्या अधिक माहतीसाठी व नाव नोंदणी साठी शुभम सावंत 9405212603, प्रफुल्ल काणेकर 9422555059 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
