कुडाळ नगर पंचायत सफाई कर्मचाऱ्यांना तीर्थक्षेत्र यात्रा

निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक अभिषेक गावडे यांचा उपक्रम*

⚡कुडाळ ता.२५-:
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव खासदार निलेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्यांसाठी तिर्थक्षेत्र यात्रेचे मोफत आयोजन कुडाळ भाजपा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या वतीने करण्यात आले. आज शनिवार दिनांक २५ मार्च रोजी सफाई कर्मचारी हे तीर्थक्षेत्र यात्रेस कुडाळ भाजपा कार्यालय येथून रवाना झाले.

यावेळी कुडाळ भाजपचे शहराध्यक्ष राकेश कांदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनी यात्रेस जाणाऱ्या कर्मचारी वर्गाला शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरपंचायत गटनेते नगरसेवक विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, निलेश परब, नगरसेविका नयना मांजरेकर, कु चांदणी कांबळी, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय वेंगुर्लेकर, अमेय सावंत, राम बांदेलकर आदी उपस्थित होते. अभिषेक गावडे यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल नगर पंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी धन्यवाद दिले.

You cannot copy content of this page