मोदी सरकारच्या हुकुमशाही विरोधात महाविकास आघाडीचे सोमवारी कुडाळात आंदोलन

⚡वेंगुर्ला ता.२५-: मोदी सरकारने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून लोकशाहीचा अंत केला आहे. या मोदी सरकारच्या हुकुमशाही विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने सोमवार दि. २७ मार्च रोजी गांधीचौक, कुडाळ येथे सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.

  या आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, सतिश सावंत, संदेश पारकर, आमदार वैभव नाईक, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, विकासभाई सावंत तसेच तिन्ही पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार
You cannot copy content of this page