⚡बांदा ता.२५-: मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मडुरा माऊली मंदिर पुलासाठी अनेक उपोषणे, आंदोलन, घेराव केले होते. ग्रामस्थांसह प्रवासी, वाहनचालक, नोकरदार तसेच विद्यार्थ्यांची पावसाळ्यात होणारी गैरसोय लक्षात घेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुलासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने ग्रामस्थांच्या लढ्याला यश आल्याचे प्रतिपादन, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले.
मडुरा माऊली मंदिर पुलाच्या कामाचे भूमिपूजन मडुरा सरपंच उदय चिंदरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजू परब बोलत होते. श्री देवी माऊली दशक्रोशी रस्ता समिती अध्यक्ष जगन्नाथ पंडित, मडुरा माजी सरपंच सुरेश परब, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, उदय देऊलकर, सोसायटी संचालक ज्ञानेश परब, भारतीय सुराज्य संस्था सावंतवाडी अध्यक्ष दिनेश नाईक, मडुरा ग्राम कमिटी माजी अध्यक्ष दिलीप परब, पिंटू परब, दाजी सातार्डेकर, श्री देवी माऊली कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष केशव परब, लाडू परब, देवस्थान समिती पदाधिकारी सोमनाथ परब, दत्ताराम परब, रमेश गुरव, नारायण जाधव, दीपक राऊळ, शांताराम माधव, अतुल गावकर, प्रवीण नाईक, रवी केरकर, विद्या धारगळकर, गजा पेडणेकर, दाजी नाईक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
मडुरा दशक्रोशीतील सर्वांसाठीच मडुरा माऊली मंदिर पूल गरजेचे आहे. पावसाळ्यात हलकासा पाऊस झाला तरी पूल पाण्याखाली जाते. त्यामुळे नोकरदारांसह प्रवासी, वाहनचालक तसेच ग्रामस्थांना ये जा करताना जीव धोक्यात घालावा लागत होता. नवीन पुलासाठी दशक्रोशीतील ग्रामस्थांनी मिळून श्री देवी माऊली दशक्रोशी रस्ता समिती स्थापन केली व अध्यक्ष जगन्नाथ पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली लढा तीव्र केला. समिती सदस्य प्रवीण पंडित, वसंत धुरी, गुरुदास गवंडे, समीर गावडे, आनंद परब, दिलीप परब, बाळू गावडे, भिकाजी धुरी, बाळू राणे, अरुण परब, तातो शेर्लेकर, यशवंत माधव आदींनी जिल्हाधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेतली. अनेक वेळा उपोषण, घेराव तसेच आंदोलनही केले. याचे फलित म्हणून आज लढ्याला यश आल्याची प्रतिक्रिया रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी दिली. दिलीप परब यांनी सर्वांचे आभार मानले.
