⚡कणकवली ता.२५-: प्रसिद्ध युवा व्याख्याता व सीमाशुल्क अधिकारी सत्यवान यशवंत रेडकर यांचे कणकवली व मालवण तालुक्यात ४ ते ६ एप्रिल २०२३ रोजी निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्याने होणार आहेत.
स्पर्धा परीक्षा संदर्भात संपूर्ण कोकण तसेच महाराष्ट्रात आपल्या व्याख्यानांचे वादळ निर्माण करणारे, शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव निर्माण करण्यासाठी अविरतपणे शैक्षणिक ज्ञानदान करणारे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र सत्यवान यशवंत रेडकर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रदान करणार आहेत.
मंगळवार ४ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली.बुधवार ५ एप्रिल रोजी सकाळी ९ वा., आर. ए. यादव हायस्कूल, आडवली, ता. मालवण.दुपारी २.०० वा., जनता विद्यामंदिर त्रिंबक सभागृह, ता. मालवण.गुरुवार ६ एप्रिल रोजी सकाळी १० वा. माता वैष्णोदेवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ओसरगाव, ता. कणकवली येथे व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
जास्तीत जास्त विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सत्यवान यशवंत रेडकर यांनी केले आहे.
सत्यवान रेडकर यांचे कणकवली व मालवण तालुक्यात निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यान
