मालवणात व्यापाऱ्याची १० लाखांची फसवणूक

विदेशी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून जास्त परताव्याचा आमिषातून प्रकार

⚡मालवण ता.२४-: विदेशी शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून जास्त परताव्याचा लाभ मिळण्याच्या आमिषातून मालवण मधील एका व्यापाऱ्यांची सुमारे १० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार मालवण पोलीस स्थानकात दाखल झाली असून फसवणूक व माहिती तंत्रज्ञान एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विदेशी शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास डॉलर मध्ये जास्त परतावा मिळेल. भारतीय चलनात पैसे मिळतील. याबाबत अँप डाउनलोड करा, असे सांगून काही रक्कम परतावा स्वरूपात मालवणातील त्या संबंधित व्यापाऱ्यास दिल्यानंतर त्यावर विश्वास ठेवून गेल्या महिन्याभरात मालवणतील त्या व्यापाऱ्याने सुमारे १० लाख रुपयांची रक्कम अँप डाउनलोड करून भरणा केली. मात्र डॉलर स्वरूपात अथवा भारतीय चलनात अश्या कोणत्याही स्वरूपाचा परतावा त्या व्यापाऱ्यास मिळाला नाही. ज्या व्यक्तीने अँप डाउनलोड करण्यास सांगितले होते, त्याच्याकडूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यामुळे मालवणातील त्या व्यापाऱ्यास आपण फ़सलो गेल्याचे लक्षात आल्याने फसवणूक प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत अधिक तपास मालवण पोलीस करत आहेत.

You cannot copy content of this page