जिल्हा परिषदेची डॉ ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञा शोध परीक्षा २६ रोजी

एकूण ५५७० विद्यार्थी झाले आहेत प्रविष्ट

ओरोस ता २४
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा पॅटर्न ठरलेली “भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे .अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा” 2022-23 रविवार 26 मार्च 2023 रोजी तालुका परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेला इयत्ता चौथी मधून ३४५८ व सातवी मधून २११२ असे एकूण ५५७० विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी केले आहे.
26 मार्च 2023 सकाळी ११ ते १२.३० या वेळेत पहिला पेपर तर दुपारी २ ते २.३० या वेळेत दुसरा पेपर घेण्यात येणार आहे. इयत्ता चौथीसाठी विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली, कुडाळ हायस्कूल कुडाळ, आर पी डी हायस्कूल सावंतवाडी, अ शी दे टोपीवाला हायस्कूल मालवण, वैभववाडी श्री माधवराव पवार विद्यालय कोकीसरे, आर के पाटकर हायस्कूल वेंगुर्ले आणि उपकेंद्र -मदर तेरेसा इंग्रजी माध्यम शाळा वेंगुर्ले, दोडामार्ग इंग्लिश स्कूल, शेठ म ग हायस्कूल देवगड तर सातवीसाठी एस एम हायस्कूल कणकवली, क म शि प्र मंडळाचे इंग्रजी माध्यमाची शाळा कुडाळ, सावंतवाडी- मिलाग्रीस हायस्कुल, भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मालवण, वैभववाडी- श्री माधवराव पवार विद्यालय कोकिसरे, वेंगुर्ले हायस्कूल वेंगुर्ले, दोडामार्ग- साटेली भेडशी हायस्कुल, देवगड- श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल जामसंडे ही परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

चौकट
विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना परीक्षेचे हॉल तिकीट, शाळेचे ओळखपत्र किंवा आधार कार्ड सोबत आणावे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी शालेय गणवेशात उपस्थित रहावे. परीक्षेला प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी त्या त्या परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी वेळीच उपस्थित राहतील याची खबरदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी धोत्रे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page