घोडमांडणी कार्यक्रमाने बांदा पारंपरिक शिमगोत्सवाची सांगता

बांदा दि.23 (प्रतिनिधी)- होऴी पौर्णिमे पासून पंधरा दिवसांनी साजरा होणाऱ्या बांद्याच्या शिमगोत्सवाची पारंपारिक घोडमोडणी कार्यक्रमाने सांगता झाली.सोमवारी बांद्याची रंगपंचंमी मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्यानंतर मंगळवारी घोडेमोडणीचा कार्यक्रम झाला.पारंपारिक मार्गाने घोड्यांच्या पाच फेऱ्या झाल्या.ग्रामस्थांनी मार्गात दुतर्फा राहून घोड्यांना प्रसाद अर्पण केला.त्यानंतर बाजारपेठेतील घोडेमोडणी देवस्थान येथे या कार्यक्रमाची सांगता झाली.
फोटो – ( बांदा येथिल घोडेमोडणी कार्यक्रम)

You cannot copy content of this page