मालवणात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा जल्लोषात संपन्न

चिमुरड्याच्या वेशभूषा लक्ष्यवेधी तर
रोंबाटने मने जिंकली ,!

⚡मालवण ता.२२-: रूढी, परंपरा, संस्कृती याची जोपासना करण्यात माहीर असलेल्या मालवणवासीयांनी आज सायंकाळी मालवण शहरातून गुढीपाडव्यानिमित्त उत्साहपूर्ण आणि जल्लोशी वातावरणात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढून नववर्षाचा आनंद अधिक द्विगुणित केला

मालवणात दरवर्षी प्रमाणे हिंदू नववर्ष स्वागत समिती व समस्त मालवणवासीयांच्या वतीने नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे हे २० वे वर्ष होते. मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर येथून या भव्य स्वागत यात्रेस प्रारंभ झाला. सुरुवातीस बबन शिंदे यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले तर आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. पंकज दिघे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या यात्रेचे उद्घाटन करण्यात आले. ही स्वागत यात्रा भरड येथून बाजारपेठ मार्गे बंदर जेटी ते फोवकांडा पिंपळ ते मामा वरेरकर नाट्यगृह अशी काढण्यात आली.

या यात्रेत पारंपारीक हिंदू वेशातील तसेच भगवे फेटे परिधान करून महिला व पुरुष सहभागी झाले होते. तर बच्चे कंपनीने विविध पौराणिक व थोर पुरुषांच्या आकर्षक वेशभूषा साकारल्या होत्या. उंट व घोडे यांच्यावर ऐतिहासिक व पौराणिक वेशभूषा केलेल्या मुलांनी स्वार होऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वायरी येथील महिलांचे वारकरी मंडळाने टाळ मृदूंगाच्या तालावर अभंग व भक्तीगीते सादर करीत यात्रेत भक्तिमय वातावरण निर्माण केले. तर तारकर्ली येथील भूषण जुवाटकर या तरुणाने निळ्या रंगात सागराची वेशभूषा करीत समुद्रात मानवाकडून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा देखावा करीत सागरी जैवविविधता वाचवा असा संदेश दिला.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य महिला ग्रुप तर्फे महिलांचे रोंबाट सादर करण्यात आले. यामध्ये अनेक महिला, तरुणी व लहान मुलांनी अनेक पौराणिक पात्रे साकारत या यात्रेत रंगत आणली.

या यात्रेत यावर्षी प्रथमच गोवा बार्देश येथील बार्देश शिमगोत्सव समितीचे रोंबाट आयोजकांकडून आमंत्रित करण्यात आले. यात्रेत सहभागी झालेल्या या रोंबाटमधील ढोल ताशा वादक व कलाकारांनी पताका नाचवत, पारंपारिक गीते व नृत्य सादर करत या यात्रेत एक वेगळेपण आणले.

ही स्वागत यात्रा व रोंबाट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मालवणवासिय उपस्थित होते. या यात्रेत आमदार वैभव नाईक, हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण अध्यक्ष उद्योजक डॉ. दिपक परब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, दत्ता सामंत, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, महेश कांदळगावकर, हरी खोबरेकर, बबन शिंदे, धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, भाऊ सामंत, बंटी केनवडेकर, सौरभ ताम्हणकर, मंदार केणी, यतीन खोत, शिल्पा खोत, सन्मेष परब, सेजल परब, बाबी जोगी, नरेश हुले, किरण वाळके, बाबा मोंडकर, बबन परुळेकर, उमेश मांजरेकर, सिद्धेश मांजरेकर, राजू बिडये, ललित चव्हाण, शेखर गाड, सौगंधराज बादेकर, संदीप बोडवे, अमित खोत कृष्णा ढोलम, प्रफुल्ल देसाई, भूषण मेतर,प्रशांत हिंदळेकर , ओंकार यादव महेश कदम दिलीप बिरमोळे, राजा गावकर, किसन मांजरेकर, पंकज सादये, गणेश कुडाळकर, अंजना सामंत, महेश जावकर, पूजा करलकर, प्रमोद करलकर, मोहन वराडकर, मंदार ओरसकर, भाई कासवकर, तपस्वी मयेकर, आकांक्षा शिरपूटे, सिया धुरी, विजय नेमळेकर, मुकेश बावकर, सुरेश बापर्डेकर, महेश सारंग, परशुराम पाटकर, विकी तोरसकर सूर्यकांत फणसेकर, मधुकर चव्हाण यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, मालवणवासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page