मल्टीस्पेशलिस्ट, कबुलायदार गावकर प्रश्न लवकरच सुटणार…

मंत्री दिपक केसरकर; राणी सरकार,युवराज यांची महसुल मंत्र्यासोबत चर्चा…

⚡सावंतवाडी ता.२२-: येथील रखडलेला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा प्रश्न लवकरच सुटणार आहे त्यासाठी दोन पर्याय राजघराण्यासमोर ठेवण्यात आले असून यासंदर्भातील चर्चा नुकतीच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत राणी साहेब शुभदादेवी भोसले व युवराज लखन भोसले यांची झाली असून दोन्ही पर्यायाची माहीती लवकरच बांधकाम विभागाकडून घेण्यात येणार असल्याची माहीती स्थानिक आमदार दत्ता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
तर आंबोली गेळे येथील कबुलातदार गावकर प्रश्नही सुटण्याच्या मार्गावर असून याबाबतचा प्रस्ताव पुढच्या आठवड्यात कॅबिनेट समोर येणार असल्याचे मंत्री केसरकर म्हणाले.

मंत्री केसरकार यांनी दूरदृष्टी प्रणाली द्वारे पत्रकारांची संवाद साधला यावेळी त्यांनी माहिती दिली ते म्हणाले, सावंतवाडी शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी भूमिपूजन झालेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या प्रश्नावरून रखडले आहे या संदर्भात नुकतीच मुंबई येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी राणी सरकार शुभदा देवी भोसले व युवराज लखम भोसले त्यांची चर्चा झाली यामध्ये जमीन व जागेचा मोबदला असे दोन पर्याय तिच्यासोबत ठेवण्यात आले आहे सदरची चर्चा सकारात्मक दृष्ट्या झाली हा प्रश्न लवकरच निकाली लागेल अशी अपेक्षा आहे जे पर्याय सुचवण्यात आले आहे त्या संदर्भात बांधकाम विभागाकडून माहिती घेण्यात येणार आहे दुसरीकडे आंबोली गेळे येथील कबुलातदार गावकर प्रश्न सुटणार आहे याबाबत कॅबिनेट समोर तशा प्रकारचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असून पुढच्या आठवड्यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे चौकुळ येथील याबाबत तेथील लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी लवकरच त्यांना मुंबईला निमंत्रित करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page