बांदा येथे २५ पासून खुल्या डबल बॅडमिंटन स्पर्धा

बांदा/प्रतिनिधी
रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे २५ व २६ मार्च रोजी खुल्या डबल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यास प्रथम पारितोषिक रोख रुपये ३ हजार व चषक तर उपविजेत्यास रोख रुपये २ हजार व चषक देण्यात येणार आहे.
ही स्पर्धा डेगवे ग्रामपंचायत नजिकच्या मैदानावर खेळविण्यात येणार असून जास्तीत जास्त बॅडमिंटन प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बांदा रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अवधूत चिंदरकर व मिताली सावंत यांच्याशी संपर्क साधावा.

You cannot copy content of this page