हस्ताक्षर स्पर्धेत लोरे मोगरवाडी शाळेचे सुयश

⚡कणकवली ता.२१-: अक्षरोत्सव परिवार व श्रावणी कम्प्युटर एज्युकेशन तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्ताने सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये वैभववाडी तालुक्यातील विद्यामंदिर लोरे-मोगरवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळवले.

गट क्रमांक एक (इयत्ता- पहिली ते चौथी) यामध्ये शिवंन्या युवराज पचकर (इयत्ता-पहिली) हिने द्वितीय क्रमांक तर रिया शिवाजी आग्रे (इयत्ता- तिसरी) हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तर सुकन्या अनिल नराम हिने उत्तेजनार्थ यश प्राप्त केले. या विद्यार्थ्यांना शिक्षक युवराज पचकर यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, विस्तार अधिकारी अशोक वडर, केंद्रप्रमुख गौतम तांबे व मुख्याध्यापक किशोर पेडणेकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांनी कौतुक केले.

You cannot copy content of this page