…अन्यथा सार्वजनिक बांधकामविरोधात तिव्र आंदोलन

आंबेगाव सरपंच शिवाजी परब यांचा इशारा

⚡सावंतवाडी ता.२१-: आंबेगाव मधलीवाडी येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे ; त्यामुळे त्याची प्रत्यक्ष पाहणी करावी व जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करू नये अन्यथा तिव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आंबेगाव सरपंच शिवाजी परब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे .

याबाबत त्यांनी कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले असून त्यात म्हटले आहे की ; आंबेगाव मधलीवाडी रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम नुकतेच करण्यात आले. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे .साईडपट्टीचा तर पत्ताच नाही परिणामी अनेक अपघात होत असल्याने या निकृष्ट कामाची आपण स्वतःहून पाहणी करावी व संबंधित ठेकेदारास काम पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात तोपर्यंत त्याचे बिलही अदा करू नये असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री योगेश गवळी व सामाजिक कार्यकर्ते संजू गावडे उपस्थित होते

You cannot copy content of this page