⚡मालवण ता.२०-: आचरा देवगड मुख्य रस्ता ते श्री देव रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट आचरेचे अध्यक्ष श्री. मिलिंद मिराशी आणि आचरे गावच्या सरपंच प्रणया टेमकर यांच्या हस्ते करण्यात आला या रस्त्याच्या कामासाठी मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून वीस लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे .
मालवण तालुक्यातील आचरा हे पर्यटन दृष्ट्या विकसित होणाऱ्या आचरे गावात प्रसिद्ध संस्थानकालीन श्री देव रामेश्वर मंदिर असून या मंदिराकडे जाणाऱ्या या रस्त्याची दुरावस्था झाली होती. आमदार वैभव नाईक यांनी या रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणासाठी वीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर ग्रामपंचायतीच्या नागरी सुविधामधून बारा लाख रुपयाचा निधी देण्यात आल्याची माहिती आचऱ्याचे माजी सरपंच तथा ग्रा.प. सदस्य मंगेश टेमकर यांनी दिली.
या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मिलिंद मिराशी आणि आचरे गावच्या सरपंच प्रणया टेमकर यांच्या हस्ते झाला. यावेळी विनायक परब, एकनाथ परब, दिलीप कोदे, संतोष मिराशी, अभय भोसले, बाबा सावन्त सचिन हडकर, अनुष्का गावकर, समीर लब्दे, नितीन घाडी, श्याम घाडी, दशरथ घाडी, राजन गावकर व इतर मान्यवर तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होते. या रस्त्याचे काम सुरु करण्यात आल्याने गावात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
