समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पाला प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी : किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्य महोत्सवास दिली भेट

*💫मालवण दि.१८-:* आपला जिल्हा स्वच्छ व सुंदर आहे. प्रत्येकाने आपल्या सदृढ आरोग्यासाठी आहाराच्या पद्धतीमध्ये बदल करणे गरजेचे असून प्रत्येकाने नवीन पिढीच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे यासाठी ब्रिगेडीअर सुधीर सावंत राबवित असलेल्या समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र राबवित असलेल्या समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पाला प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य लाभेल अशी ग्वाही सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी येथे बोलताना दिली किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्य महोत्सवास जिल्ह्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी भेट दिल्यानंतर आज किर्लोस येथे फळ प्रक्रिया केंद्राचे भूमिपूजन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.संजय भावे, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, माजी आमदार राजन तेली, शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्टी बजरंग चव्हाण, सिंधुदुर्ग एनसीसी युनिटचे प्रमुख कर्नल नरेश उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत सर्वांनी समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पाचे व नैसर्गिक शेती प्रदर्शनाची पहाणी केली यावेळी बोलताना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या ब्रिगेडीअर सुधीर सावंत हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे चॅम्पियन आहेत. २५ वर्षे शेतकऱ्यांसाठी काम करत असून नैसर्गिक शेती क्रांती निर्माण करत आहेत त्याबद्दल ब्रिगेडीअर यांचे अभिनंदन केले. ब्रिगेडियर सुधीर सावंत शेतकर्यांसाठी खूप चांगले काम करत असून संपुर्ण प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या उपक्रमांना मदत करून पाठीशी राहिले असे सांगत त्या म्हणाल्या शेती ही संस्कृती आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक नफा व्हायला पाहिजे. त्यावेळीच लोक शेती करू लागतील. असे त्या म्हणाल्या यावेळी ब्रिगे.सुधीर सावंत यांनी देशाला संरक्षण व अन्न पुरविणारी जमात म्हणजे शेतकरी. गेल्या २५ वर्षात शेतकर्यांसाठी विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक स्तर उंचवण्यात कृषी प्रतिष्ठानचा सिंहाचा वाटा आहे. यापुढे जाऊन जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारत भर नैसर्गिक शेती क्रांतीची चळवळ उभी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला . यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, बजरंग चव्हाण, राजन तेली यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. शिवाजी स्मारक मंडळ यांचे तर्फे बजरंग चव्हाण यांनी एक लाख रु. धनादेश कृषी प्रतिष्ठानाला मदत स्वरूपात सुपूर्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख भास्कर काजरेकर यांनी केले. सूत्र संचालन प्रा. स्नेहा सामंत, मयूर सावंत यांनी केले. यावेळी आभार डॉ. शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत यांनी मांनले.

You cannot copy content of this page