पाककला स्पर्धेच्या संध्या ढोलम ठरल्या विजेत्या

बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्यावतीने आयोजित केली होती स्पर्धा

मालवण दि प्रतिनिधी

बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्यावतीने आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेत संध्या ढोलम यांच्या खरवस पाककृतीस प्रथम क्रमांक मिळाला.

बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्यावतीने आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मूगडाळ या घटकावर पाककृती सादर करायची होती. कट्टा परिसरातील ३३ स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. पुरणपोळी, भजी, वडे, खरवस, अप्पे, हलवा, इडली वडा, लाडू ढोकळा, खाजे, कचोरी इत्यादी विविध पाककृती सुबकतेने सजावट करून मांडण्यात आल्या होत्या. त्याचे परीक्षण मधुरा माडयें, आरती कांबळी व प्रियांका भोगटे यांनी केले.

या स्पर्धेत संध्या ढोलम यांच्या खरवस पाककृतीस प्रथम क्रमांक मिळाला. द्वितीय क्रमांक- अर्चना धुत्रे पकोडा, सोनाली मोरजकर – पुरणपोळी, तृतीय क्रमांक- दिक्षा रेवडेकर- अप्पे, विजयश्री गावडे- हलवा, चतुर्थ क्रमांक-वेदा ताम्हणकर-इडली, पायल देऊलकर-लाडू, शुभदा वेंगुर्लेकर- कचोरी, पाचवा क्रमांक- स्वाती पुटवाड-सुविधा मलये, विदुला ताम्हणकर, हर्षदा चव्हाण, उत्तेजनार्थ- सायली बोडये, दिलीशा गुराम यांना गौरविण्यात आले.

या स्पर्धेचा बक्षीस समारंभ अॅड. समृद्धी म्हाडगूत, सायली चव्हाण, नितीन वाळके, हरेश चव्हाण, बापू तळावडेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, दीपक भोगटे, मनोज काळसेकर, वैष्णवी लाड, बाळकृष्ण नांदोसकर यांच्या उपस्थितीत झाला.

You cannot copy content of this page