नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला इशारा
⚡कणकवली ता.१८-: कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पॅचवर्क तात्काळ न केल्यास हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉनवर हल्लाबोल करण्याचा इशारा कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला आहे.
कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या जुन्या जागेवरील पॅचवर्क अजूनही हायवे ठेकेदाराने केलेले नाही. खड्डेमय असलेल्या या जागेत डांबर सिलकोट मारून पॅचवर्क करणे अत्यावश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नवीन जागी बसवून 6 महिने झाले तरी अद्याप सर्व्हिस रोडवरील पुतळा हटविलेल्या जागेचे पॅचवर्क करण्यात आलेले नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे. अपघाताची दुर्घटना होण्याआधीच तात्काळ पॅचवर्क करा अन्यथा हल्लाबोल करण्याचा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला आहे.
