संजू परबांचा पुढाकार; तर रफिक शेख यांच्याकडून वाहतूक पोलिसांसाठी उभारली पत्राची शेड
⚡सावंतवाडी ता.१७-: भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवस आज नगराध्यक्ष संजू परब यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील भाजीविक्रेत्या महिलांना धान्य वाटप करण्यात आले. तर ऊन पाऊस झेलत नगरपालिकेसमोर उभे असणाऱ्या वाहतूक पोलिसांसाठी पत्राची शेड रफिक शेख यांच्या माध्यमातून उभारून देण्यात आली असून त्याचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेवक मनोज नाईक, शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर, गुरु मठकर सत्यवान बांदेकर, केतन आजगावकर,समीर, पालव आदी उपस्थित होते.
