अपघातात रिक्षा चालक किरकोळ तर महिला प्रवासी गंभीर
*💫कणकवली दि.१८-:* कारला बाजू देत असताना रिक्षा गटारात कलंडूनअपघात झाला. अपघातात रिक्षाचालकाला किरकोळ दुखापत झाली तर आतील महिला गंभीर प्रवासी जखमी झाली. कणकवली – आचरा रस्त्यावर फणसनगर सावंतवाडा येथे आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सावंतवाडा येथून कणकवली आचरा महामार्गावर अचानक आलेल्या कारला बाजू देताना रिक्षा रस्त्यालगत च्या गटारात जाऊन अपघात घडला. अपघातात रिक्षाचे पुढील चाक तुटून पडले होते. रिक्षाचा टफ ही तुटला होता. रिक्षाचालका ला किरकोळ दुखापत झाली तर आतील प्रवासी महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला कणकवलीत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
