माजी खा निलेश राणे यांच्या वाढदिनी कुडाळ येथे आयोजन;आयोजक विशाल परब यांनी घेतला आढावा
⚡कुडाळ ता.१५-: भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल सेवा फाउंडेशन व भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त विद्यामाने १७ मार्च रोजी कोकण पर्यटन २०२३ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित “शिवगर्जना” हे महानाट्य होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कुडाळ एसटी डेपो स्टॅन्ड परिसरात जंगी तयारी सुरू करण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर विशाल परब यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत कार्यक्रम नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आवश्यक असा सूचना देखील पोलीस व पदाधिकाऱ्यांना केल्या.
माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल सेवा फाऊंडेशन सिंधुदुर्ग व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने 17 मार्चला कोकण पर्यटन महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले असून यात आशिया खंडातील सर्वात मोठे छत्रपती शिवाजी महाराज्यावर आधारीत “शिवगर्जना” हे महानाट्य होणार आहे. कुडाळ नवीन बस स्टँड समोर सायंकाळी ५ वाजता हे महानाट्य होणार असल्याची माहीती भाजपाचे जिल्हा प्रवक्ते संजू परब व विशाल फाऊंडेशनचे सर्वेसर्वा उद्योजक विशाल परब यांनी संयुक्त परिषदेत दिली होती.
माजी खासदार राणे यांच्या वाढदिनी गेली कित्येक वर्ष विशाल परब यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत. यावर्षी महानाट्य ठेवण्यात आले आहे. कुडाळ नवीन बस स्टँड येथे पाच वाजता या कार्यक्रमाचा नारळ फोडणार आहे, सिधुदुर्ग व राज्याचे आयडाॅल माजी खासदार निलेश राणे यांना विशाल परब आपले राजकीय गुरु आहे, त्याच्या माध्यमातून आपल्या सारखे अनेक चेहरे उजेडात आले, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे छत्रपतींच्या जीवनगाथा नवीन पिढीला ज्ञात व्हावी हा महानाट्य सादर करण्यामागचा उद्देश आहे. या महानाट्यात बाहेरील कलाकारांसोबत स्थानिकांनाही कला सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. जवळपास सातशे कलाकार या नाटकात आहेत.
या महानाट्यत हत्ती, घोडे असे प्राणी असणार आहे. या महानाट्याला नेते उपस्थित राहणार असून. आठही तालुक्यातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थाना मोफत पास देण्यात येणार आहे.
या शो हिंदीत दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात होणार आहे. हत्ती, घोडे, उंट असे प्राणी असणार आहे, तर भव्यदिव्य असा रंगमंच उभारण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील लोककलेच सादरीकरण होणार असून शिवराज्याभिषेक दरम्यान फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे.
माजी खासदार डाॅ.निलेश राणे याचा वाढदिवस मंत्री महोदयांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे, या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, अनुराग ठाकूर यांच्यासह गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती विशालसेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा तथा भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी दिली.तर पहिल्या दिवशीच्या नाट्यप्रयोगासाठी तब्बल चाळीस हजारहुन शिवप्रेमी व निलेश राणे प्रेमी उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले.
श्री परब यांनी सांगितले.
या नाटकाची जय्यत तयारी कुडाळ सुरू आहे. या नाट्यप्रयोगासाठी राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. पहिल्या दिवशी 17 तारीख ला निलेश राणे यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेता पार्किंगची व्यवस्था ही करण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये, याची सर्व जबाबदारी विशाल सेवा फाउंडेशनचे कार्यकर्ते, पदाधिकारी घेत आहेत. तसेच हा नाट्यप्रयोग शिवप्रेमी तसेच निलेश राणे प्रेमी यांना चांगल्या पद्धतीने पाहता यावा यासाठी नियोजनबद्ध अशी बैठक व्यवस्था ही करण्यात आली आहे. बाल्कनीची व्यवस्था ही या ठिकाणी असणार आहे.
