किर्लोस्कर कंपनीचे यश हे पूर्वजांनी किर्लोस गावात केलेल्या कार्याचे फलित

संजय किर्लोस्कर यांचे प्रतिपादन

*💫मालवण दि.१७-:* साधारण २०० वर्षापूर्वी किर्लोस गावातून किर्लोसकर कुटुंब बेळगाव मधील कुठल्याशा गावात गेले तेव्हापासून आता पर्यंत भारताबरोबरच अमेरिका, नेदरलँड, साऊथ आफ्रीका, थायलंड, आणि इंग्लड या देशात किर्लोस्कर उद्योग सुरु आहेत. हे सारे घडले ते आमच्या पूर्वजांनी किर्लोस गावात जे काही केले त्याच्या पुण्याईमुळे घडले यापुढे किर्लोसकर कंपनी आणि सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान एकत्र काम करू असे प्रतिपादन किर्लोसकर उद्योग समूहाचे अध्यक्ष संजय किर्लोसकर यांनी येथे बोलताना केले किर्लोस येथील विज्ञान केंद्राचा रौप्य महोत्सव ढोल ताश्यांच्या गजरात सुरु झाला. किर्लोसकर उद्योग समूहाचे अध्यक्ष संजय किर्लोसकर व त्यांचा मुलगा आलोक किर्लोसकर, मॅप्रोचे संचालक निकुंज वोरा, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत रौप्य महोत्सवाचा उदघाटन सोहळा पार पडला. सर्व प्रथम किर्लोस येथील मूळ गावी मंदिरामध्ये किर्लोसकर कुटुंबांनी भेट घेतली. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राने मांडलेल्या समृद्ध व आनंदी गाव प्रकल्पाचे व नैसर्गीक शेती प्रदर्शनाचे किर्लोसकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. समृद्ध व आनंदी गाव संकल्पनेचे जनक व संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार सुधीर सावंत यांनी समृद्ध व आनंदी गाव प्रकल्पाची सविस्तर माहिती सादर केली. संजय किर्लोसकर म्हणाले मी माझ्या मुळ गावी येऊन अत्यंत आनंदी झालो. इथे येण्याची संधी ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त केले. कृषी प्रतिष्ठान शेतकऱ्यांना चांगल्या सर्विस देत आहेत त्याबद्दल आनंद व्यक्त केला. मी पुन्हा पुन्हा या गावी येत जाईन असे म्हणाले. गावातील संकृती पाहून मन समाधान झाल्याचे ते म्हणाले. कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत म्हणाले गाव आनंदी आणि समृद्ध झाले पाहिजे. गावा गावात रोजगाराची साधने निर्माण झाली पाहिजेत. प्रत्येकाने जमिनीची सेवा केली पाहिजे. सैनिक हा शेतकऱ्यांचा मुलगा असतो. शेतकरी देशाला अन्न सुरक्षा देण्याच काम करतो. जय जवान जय किसान हा नारा गाव गावात पोहचला पाहिजे. गावागावातच काजू कारखाना, फळ प्रक्रिया केंद्रे चालू झाली पाहिजेत. शेती मध्ये प्रक्रिया उद्योग उभारणे काळाची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी औद्योगिक जिल्हा म्हणून नावारूपास यायला पाहिजे असे ते म्हणाले. गाव समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल असे ते म्हणाले. कार्यक्रमावेळी समाजसेवक, प्रगतीशील शेतकरी, किर्लोस ग्रामस्थ यांचा कृषी प्रतिष्ठानद्वारे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अॅडव्होकेट उमेश सावंत, डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष प्रदीप सावंत, सचिव दिनानाथ वेरनेकर, संचालक सुशांत नाईक, बाबू रावराणे, प्राचार्य आशिष पाटील, आनंद सावंत, बाळा लाड, किशोर लाड, प्रशांत सावंत, बाळू मेस्त्री उपस्थित होते. तसेच फ्रेंड ऑफ फार्मर्स चे नीलम दळवी, प्लेचर पटेल, उन्मेष बागवे, अमर आपटे उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख भास्कर काजरेकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. स्नेहा सामंत व मयूर सावंत यांनी केले. आभार प्रदीप सावंत यांनी मांडले.

You cannot copy content of this page