⚡आंबोली,ता.१३-: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी (ता.१५) सिंधू आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता आरोग्य मेळाव्याचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार असून तज्ञ डॉक्टर,अस्तिरोग तज्ञ,बालरोग तज्ञ,जनरल चिकित्सक,नेत्र चिकित्सक तपासणी करणार आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी देखील उपस्थित असणार आहेत.या आरोग्य शिबिराचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन आंबोली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश जाधव आणि डॉ.आदिती पाटकर यांनी केले आहे.
