Headlines

ऍड परिमल नाईक यांच्या रूपाने जिल्हा बार असोसिएशनला मिळाले अनुभवी जिल्हाध्यक्ष

३० वर्षे करीत आहेत वकिली;विशेष सरकारी वकील म्हणून कोकणात पाडत आहेत छाप

⚡सावंतवाडी ता.१३-: गेली ३० वर्षे सातत्याने जिल्ह्यातील विविध न्यायालयांत वकिली करणाऱ्या ऍड परिमल गजानन नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडी बद्दल ऍड नाईक यांचे जिल्ह्यात सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून भाजप पदाधिकारी व मित्र परिवाराकडून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.

२००० ते २००७ या कालावधीत जिल्हा सरकारी वकील आणि अभियोक्ता म्हणून काम पाहिलेल्या ऍड नाईक यांची २००० मध्ये दिवाणी न्यायाधीश (क स्तर) म्हणून निवड झाली होती. परंतु त्यांनी ती नाकारली. विशेष सरकारी वकील म्हणून कोकणातील सहा जिल्ह्यांत ते काम पाहत आहेत. सावंतवाडी तालुका बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष राहिलेल्या ऍड नाईक यांनी सावंतवाडी नगरपालिकेत नगरसेवक म्हणून पाच वर्षे यशस्वी कामगिरी बजावली आहे. या काळात त्यांनी आरोग्य, क्रीडा सभापती म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. लायन्स क्लब सावंतवाडीचे माजी अध्यक्ष राहिलेले ऍड नाईक सध्या लवाद म्हणून कार्यरत आहेत. जिल्ह्याच्या अनेक सामाजिक कार्यात पुढे असलेले ऍड नाईक व्यावसायिक कंपन्या आणि बँका यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. जिल्ह्यात सध्या ते नोटरी पब्लिक म्हणून कार्यरत असून जिल्ह्याच्या समाजाभिमुख कार्यात सुद्धा आघाडीवर असतात. बी एस आय, एल एल बी, डी टी एल, डी एल एल आणि एक डब्लू हे त्यांचे शिक्षण आहे.

जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीत एका मताने त्यांचे जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली आहे.यामुळे ऍड परिमल नाईक यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page