पश्चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव
*💫बांदा दि.१७-:* बांदा येथील देवस्थान समितीच्या माध्यमातून होणारे सर्व प्रकारचे व्यवहार हे पारदर्शक आहेत. पश्चिम देवस्थान समितीच्या माध्यमातून या तीन तालुक्यातील विविध देवस्थान उपसमित्या करत असलेल्या सर्व कारभारांवर देखरेख ठेवली जात आहे. त्यामुळे भविष्यातही देवस्थान समितींचा कारभार हा पारदर्शक आणि स्वच्छच असेल, असा विश्वास पश्चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी बांदा येथे व्यक्त केला. बांदा येथील भूमिका मंदिरात देवस्थान उपसमितीना येणाऱ्या समस्या व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करत होते. यावेळी श्री.जाधव बोलत होते. यावेळी महेश जाधव यांनी श्री बांदेश्वर मंदिर बांधकाम आणि परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी बांदा देवस्थान उपसमिती सदस्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी बांदा देवस्थान समितीच्या वतीने सचिव एस.आर.सावंत यांच्याहस्ते महेश जाधव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नेतर्डे देवस्थान समितीच्या वतीने जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांनीही श्री.जाधव यांचा सन्मान केला. यावेळी पश्चिम देवस्थान समिती सचिव विजय पोवार, सहसचिव श्रीमती इंगवले, सदस्य राजाराम गरुड,राजेंद्र जाधव, चारुदत्त देसाई, उपअभियंता सुयश पाटील, बांदा सरपंच अक्रम खान, सुभाष मोर्ये, राजा सावंत, अरुण देसाई, गुरुनाथ सावंत, संजय सावंत, मंदार कल्याणकर, साईप्रसाद कल्याणकर आदी उपस्थित होते.
