Headlines

मनावर ताबा मिळविल्यास आपल्याकडून चांगल्या गोष्टी घडतात

समुपदेशक सुमेधा देसाई यांचे देवगड महाविद्यालयात प्रतिपादन

⚡देवगड ता.११-: व्यक्तीच्या प्रत्येक कृतीमागे त्याचे मन असते. या मनावर योग्य नियंत्रण मिळवले की अनेक गोष्टी सहज साध्य होतात. आपण सर्व प्रथम माणूस आहोत आणि नंतर त्यामध्ये व्यवहाराच्या सोयीसाठी स्त्री – पुरुष असा भेद केला आहे. दीर्घ काळापासून मुलाचा जन्म श्रेष्ठ आणि मुलीचा कनिष्ठ असा समज आहे. आपल्या मनाची जडण घडण याला कारणीभूत आहे. कामाची विभागणी करतानाही ही कामे मुलींची आणि ही कामे मुलांची असे न करता काम हे काम आहे असे विचार दृढ झाला पाहिजे. आज आपल्या आजूबाजूला असलेली अनेक व्यवधाने आपले लक्ष विचलित करतात. जगातील अनेक लोक अनेक संकटांवर मात करून यशस्वी झाली आहेत, स्वतः सोबत त्यांनी इतरांच्या विकासाचा विचार केला आहे, यासाठी त्यांच्या मनाची शक्ती महत्त्वाची ठरली. म्हणूनच आपणसुद्धा आपल्या मनावर योग्य संस्कार केले पाहिजे. त्यासाठी S W O T हे शब्द सूत्र लक्षात ठेवले पाहिजे. आपली शक्तिस्थाने, कमतरता, संधी आणि धोके याचा विचार करून योग्य नियोजन केले पाहिजे. प्रत्येकामध्ये एक विशेष गुण असतोच त्याचा शोध घेऊन विकास केला पाहिजे. तेव्हाच माणूस म्हणून आपली जडण घडण होईल आणि ती स्वतः साठी आणि समाजासाठी महत्त्वाची ठरेल”. देवगड महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाने आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या प्रसिद्ध समुपदेशक आणि पेशाने वकील असलेल्या सुमेधा संजीव देसाई यांनी उपस्थितांना वरील मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी सर्वांकडून मन:शांतीसाठी आवश्यक असलेली तंत्रे प्रात्यक्षिक स्वरूपात करून घेतली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या या तंत्राला उत्तम प्रतिसाद दिला.

याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. सुखदा जांबळे, महाविद्यालय महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा. रश्मी हिर्लेकर उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले, प्रा. रश्मी हिर्लेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. बँकिग अँड इन्शुरन्स विभागातील पूर्वा बापट – डॉ.आनंदी जोशी, साक्षी राणे – सिंधुताई सपकाळ, प्राजक्ता त्रिंबककर – लता मंगेशकर, संज्योत रुमडे – गणित तज्ज्ञ शकुतला देवी अशाप्रकारे देशातील महत्त्वाच्या महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. या दिनाचे औचित्य साधून महविद्यालयातील प्रथम वर्ष माहिती तंत्रज्ञान विभागात शिकणारा आणि युवा महोत्सवाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या गायक वृंदातून महविद्याल्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कु. सुधांशु समीर सोमण याचा त्याच्या पालकांसह प्राचार्यांच्या हस्ते सन्मानपत्र, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना श्री. समीर सोमण यांनी सुधांशुच्या यशात शिक्षण विकास मंडळ,देवगड या संस्थेचे तसेच प्राचार्या आणि सहकार्य करणाऱ्या प्राध्यापकांचे आभार मानले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. सुखदा जांबळे यांनी, “ महिला सक्षमीकरण हेच महिला दिवस साजरा करण्याचे खरे कारण आहे. आपण सर्व समान आहोत या भावनेने समाज जडण घडण होईल तेव्हाच एक संघटित समाज निर्माण होईल त्यासाठी मनातील, विचार, भावना आणि कृती यांच्यावर योग्य प्रक्रिया झाली पाहिजे” असे विचार मांडताना, विद्यार्थ्यांचा मनोविकास साधण्यासाठी यापुढेही देसाई मॅडमचे मार्गदर्शन आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सुधांशु आणि त्याच्या पालकांचे कौतुक करून सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा आदर्श घ्यावा असेही सांगितले. या कार्यक्रमाला आय क्यू ए सी समन्वयक डॉ.सुखदा जांबळे, महाविद्यालय महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा. रश्मी हिर्लेकर उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले, प्रा. रश्मी हिर्लेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. बँकिग अँड इन्शुरन्स विभागातील पूर्वा बापट – डॉ.आनंदी जोशी, साक्षी राणे – सिंधुताई सपकाळ, प्राजक्ता त्रिंबककर – लता मंगेशकर, संज्योत रुमडे – गणित तज्ज्ञ शकुतला देवी अशाप्रकारे देशातील महत्त्वाच्या महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. या दिनाचे औचित्य साधून महविद्यालयातील प्रथम वर्ष माहिती तंत्रज्ञान विभागात शिकणारा आणि युवा महोत्सवाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या गायक वृंदातून महविद्याल्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कु. सुधांशु समीर सोमण याचा त्याच्या पालकांसह प्राचार्यांच्या हस्ते सन्मानपत्र, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना श्री. समीर सोमण यांनी सुधांशुच्या यशात शिक्षण विकास मंडळ,देवगड या संस्थेचे तसेच प्राचार्या आणि सहकार्य करणाऱ्या प्राध्यापकांचे आभार मानले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. सुखदा जांबळे यांनी, “ महिला सक्षमीकरण हेच महिला दिवस साजरा करण्याचे खरे कारण आहे. आपण सर्व समान आहोत या भावनेने समाज जडण घडण होईल तेव्हाच एक संघटित समाज निर्माण होईल त्यासाठी मनातील, विचार, भावना आणि कृती यांच्यावर योग्य प्रक्रिया झाली पाहिजे” असे विचार मांडताना, विद्यार्थ्यांचा मनोविकास साधण्यासाठी यापुढेही देसाई मॅडमचे मार्गदर्शन आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सुधांशु आणि त्याच्या पालकांचे कौतुक करून सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा आदर्श घ्यावा असेही सांगितले. या कार्यक्रमाला आय क्यू ए सी समन्वयक डॉ. सुनेत्रा ढेरे, उपप्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यासोबत महाविद्यालयातील विद्यार्थिनींना स्वसंरक्षण करण्यासाठी ‘मार्शल आर्टचे’ प्रा. गोफणे यांचे सहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. त्याला देखील विद्यार्थिनीचा चांगला प्रतिसाद आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमश्री चिटणीस यांनी तर प्रा. तनुजा घारे यांनी आभार प्रदर्शन केले.

You cannot copy content of this page