⚡देवगड ता.११-: जामसंडे हुन तळेबाजारच्या दिशेने जाणारी तीनचाकी रिक्षा व तळेबाजारहून जामसंडेकडे येणारी स्विफ्ट कार चारचाकी यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षा चालक अभिजित पुजारे यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने अधिक उपचाराकरिता ओरोस येथे दाखल करण्यात आले परंतु या गंभीर दुखपतीत त्याचे दु.२ वाजण्याच्या दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली त्यामुळे नाडण.परीसरात शोककळा पसरली आहे.
या अपघातात रिक्षाचे व स्विफ्टकारचे दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रिक्षा मधील महिला व तिच्या छोट्या मुलाला किरकोळ दुखापत झाली.या अपघाताची फिर्याद सौ रचना राजेंद्र धुरी (४०)रा .तळवडे धुरीवाडी यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली सरदरची घटना ११ मार्च रोजी स.११ वाजण्याच्या सुमारास खाक्षी तिठा नजीक वळणा जवळ घडली
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार
रिक्षा चालक अभिजीत कृष्णा पुजारे व (३५) वर्ष रा. नाडण तालुका देवगड याने आपल्या ताब्यातील रिक्षा एम एच ०७ बी ७५४७ ही भरधाव वेगाने चालविल्याने समोरून येणारी चार चाकी वाहन एम एच ०७ ए बी १३५२ यास धडक दिल्याने रिक्षातील महिला मुलीस तसेच दशरथ चव्हाण पोलीस उप निरीक्षक (ग्रेड) देवगड यांना दुखापत होऊन दोन्ही गाड्यांचे नुकसान होऊन स्वतःच्या गंभीर व किरकोळ दुखापत केली .याअपघातातील रिक्षा चालक अभिजित पुजारे याना तात्काळ शासकीय रुग्णालय देवगड येथे हलविण्यात येऊन पुढील उपचारकरिता ओरोस येथे हलविण्यात आले परंतु ओरोस येथे उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली या अपघातातील रिक्षा चालकावर
भा. द. वि. कलम २७९,३३७,३३८,४२७,मो.वा.अधि.क १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास देवगड पोलीस करीत आहेत.
