साहित्यिक डॉ. गोविंद काजरेकर : बांदा नट वाचनालयात साहित्यीक कै. प्र.सी.नेरुरकर जन्म दिवस साजरा
*💫बांदा दि.१७-:* साहित्यातून अनेक माणसे जाेडली गेली. साहित्यीक कै. प्र.सी.नेरुरकर हे एक प्रेमळ माणुस हाेते. आपली माती जगात कुठे कुठे आहे याचा शाेध ते घेत असत. बांदा नट वाचनालयाने अशा साहीत्यीकाची आठवण या कार्यक्रमात करुन व त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. ज्या गावात असे ग्रंथालय आहे ते गाव खरच श्रीमंत असते, असे प्रतिपादन, साहित्यिक डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले. बांदा येथील नट वाचनालयात प्रसिध्द साहीत्यीक कै. प्र.सी. नेरूरकर यांचा जन्म दिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम गेली 24 वर्षे केला जाताे. यावेळी या कार्यक्रमाचे मान्यवर म्हणून प्र.सी.चे भाऊ प्रकाश नेरुरकर, प्रसिध्द साहीत्यीक डाँ गाेवींद काजरेकर, अध्यक्ष नट वाचनालय एस. आर. सावंत, उद्याेजक शशीकांत पित्रे, उपाध्यष सुभाष माेर्ये उपस्थित हाेते. यावेळी प्रकाश नेरुरकर यांनी प्र.सी.च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. डाँ गाेवींद काजरेकर व शशीकांत पित्रे यानी दिपप्रज्वलीत केली. या कार्यक्रमात प्रसिध्द साहीत्यीक डाँ गाेवींद काजरेकर याना प्रकाश नेरुरकर यांंच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मान पत्र देऊन बांदा नट वाचनालयच्यावतीने गाैरवीण्यात आले.
