*महिला भाजपच्या वतीने सावंतवाडी पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
*💫सावंतवाडी दि.१७-:* परळी येथील तरुणी पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात आरोप होत असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे सावंतवाडी महिला भाजपच्या वतीने शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी महिला पोलीस ए पी आय स्वाती यादव यांच्याकडे केली आहे. यावेळी नगरसेविका दिपाली भालेकर, नगरसेविका समृध्दी विर्नोडकर, निर्मला यादव, मिसबा शेख, मेघना साळगावकर, सुप्रिया केसरकर, ज्योती पाटणकर आदी उपस्थित होते.
