राष्ट्रपुरुषांच्या जयंत्यानाच निर्बंध का…?

वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांचा राज्य सरकारला सवाल

*💫बांदा दि.१७-:* कोरोनाचे कारण देऊन राज्य सरकार वेळोवेळी महापुरुषांच्या जयंत्यावर निर्बंध घालत आहे. हे काम मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत चालू असून यापुढे राज्य सरकारचे हे नियम आम्ही मुुुळीच मान्य करणार नाही. कारण जर राज्यात आणि देशात सर्व व्यवहार सुरळीत होत असताना राष्ट्रपुरुषांच्या जयंत्यानाच निर्बंध, का असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी राज्य सरकारला विचारला आहे. याबाबत बोलताना महेश कोळेकर म्हणाले की, मार्च २९२० या सालामध्ये कोरोना महामारीने एक वेगळेच रूप धारण केले होते. त्यामुळे देशात भीतीचे वातावरण होते. संसर्गाची भीती लक्षात घेता, राज्य सरकारने म्हणण्यापेक्षा संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते. मात्र नंतरच्या काळात सर्व वातावरण बदलले आहे. आज देशात म्हणावा तसा कोरोनाचा फैलाव राहिलेला नाही, असे चित्र सरकारने उभे केले आहे. कारण आज देशात राष्ट्रीय स्तरावर क्रिकेटसह अन्य खेळाने क्रीडा मैदाने भरत आहेत. वेगवेगळ्या राज्यात निवडणूक, आपल्याही जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका पार पडल्या, रोज वेगवेगळे उत्सव समारंभ होत आहेत. राज्यात लोकल सेवांना तसेच एस.टी . प्रवाशांना परवानग्या दिल्या जात आहेत, गावागावात गल्लीबोळात बाजार भरत आहेत, देशातील व राज्यातील उद्योग व सरकारी, निमसरकारी कार्यालये सुरळीतपणे चालू आहेत, शाळा, महाविद्यालये सुरळीत चालू आहेत, असे असताना फक्त आणि फक्त राष्ट्रीय पुरुषांच्या जयंत्यानाच कुणाचा अडथळा का, यामुळे असे काय होणार याचे उत्तर आम्हाला अद्याप पर्यंत मिळाले नाही. त्यामुळे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव १९ फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात व कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे सावंतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिरात शुक्रवार १९ रोजी निच्छित साजरा करणार आहोत. या उत्सवात शासनाने आडकाठी आणण्याचा प्रयत्न करू नये.छत्रपतींच्या प्रेमापोटी उत्सव साजरा करणारच असे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी महाराष्ट्र सरकार बरोबरच जिल्हा प्रशासनालाही ठासून सांगितले आहे.

You cannot copy content of this page