राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून आंबोलीत विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन…

⚡बांदा ता.१३-: मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या १४ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंबोली येथील हिरण्यकेशी मंदिर येथे अभिषेकासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मनसे सावंतवाडी तालुकाप्रमुख मिलिंद सावंत यांनी दिली.
राज ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी हिरण्यकेश मंदिरात विशेष अभिषेक करण्यात येणार असून, यानिमित्त गरजू कुटुंबांना धान्याचे वाटप करण्यात येईल. तसेच रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना फळांचे वितरण करून सामाजिक बांधिलकी जपली जाणार आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मनसेच्या वतीने एक हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, या उपक्रमात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सहभागी होणार आहेत. सामाजिक उत्तरदायित्व जपत वाढदिवस साजरा करण्याचा मनसेचा प्रयत्न असल्याचे मिलिंद सावंत यांनी सांगितले.
या सर्व उपक्रमांमध्ये मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page