*💫कणकवली दि.१७-:* एकाच दिवशी 200 की.मी.सायकलरायडिंग करणाऱ्या कणकवलीतील एस. एम. हायस्कुलचा विद्यार्थी एनसीसी सिनियर कॅडेट नितांत राजन ऋजुता चव्हाण याचा कर्नल नरेश कुमार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. एस.एम.हायस्कुलमध्ये नववी मध्ये शिकत असलेल्या नितांत चव्हाण याला सायकल रायडिंगची मोठी आवड आहे. जिल्ह्यातील विविध सायकल रॅलीत नितांत चा नेहमी सहभाग असतो.सहावीत असताना नितांत याने राष्ट्र सेवा दलाच्या कोल्हापूर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या 7 दिवसीय सदभावना सायकल रॅलीत सहभागी होत 480 की.मी.सायकल राईड केली होती. कणकवली सायकल राईडर्स क्लब चा सदस्य असलेला नितांत याने रविवार 14 फेब्रुवारी 2021 रोजी वरवडे – कणकवली -कासार्डे -विजयदुर्ग – कणकवली – पणदूर – कणकवली – वरवडे मार्गावर 201 की.मी.सायकल रायडिंग पूर्ण केले. पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत नितांत याने हे अंतर सायकल चालवून पूर्ण केले. एस एम हायस्कुलमध्ये एनसीसी कॅम्प च्या निमित्ताने आलेल्या कर्नल नरेश कुमार यांनी नितांत च्या या विशेष कामगिरीची दखल घेत नितांत चा विशेष सत्कार केला. यावेळी एएनओ प्रधान, सिटीओ श्रीमती गावित, सुभेदार सोमनाथ वाल, सी एच एम दिलीपकुमार, सुभेदार सरोजकुमार पांडा आदी उपस्थित होते. नितांत याचे संस्था चेअरमन डॉ तायशेट्ये, सचिव नलावडे, कार्याध्यक्ष काणेकर, मुख्याध्यापक पोद्दार यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कर्नल नरेश कुमार यांच्या हस्ते सायकलपटू नितांत चव्हाण चा सत्कार…
