अध्यक्ष संजय कदम यांचे प्रतिपादन ;राज्यस्तरीय चतुर्थ वर्धापन दिन सोहळा थाटात
⚡कणकवली ता.०८-:
इमान आमच्या मातीशी.. माणुसकीच्या नात्याशी हे ब्रीदवाक्य असणारी संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था महाराष्ट्र मुंबई ही राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारी समाज संघटना आहे. संघटनेच्या माध्यमातून चर्मकार समाजातील ज्ञातीबांधवांचे हित जपले जाते.नैसर्गिक आपत्ती असो अथवा कुठलेही संकट असो आमची संघटना नेहमीच समाजाच्या पाठीशी उभी असते. आपापल्या क्षेत्रात आपल्या कार्यक्तर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या समाजबांधव भगिनींचा आज राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जात आहे.
सिंधुदुर्गात साकारत असलेल्या चर्मकार समाज भवनसाठीही आमची संस्था यथाशक्ती आर्थिक सहकार्य करणार आहे. चर्मकार समाजाच्या समस्यांसंदर्भात आमची संस्था केवळ राज्यस्तर नव्हे तर राष्ट्रीयस्तरावर कार्यरत आहे असे प्रतिपादन संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय उर्फ छोटू कदम यांनी केले.
संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचा चतुर्थ वर्धापन दिन सोहळा नुकताच कणकवली येथे संस्थेचे राज्याध्यक्ष संजय कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे राज्यसरचिटणीस प्रसाद मसुरकर, उपाध्यक्ष पंढरी जाधव, राज्य खजिनदार रविंद्र पावसकर, संचालक प्रा भिकाजी नेरकर, देवेंद्र कसालकर, अमित चव्हाण तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राधानगरी तालुका माजी उपसभापती रवीश पाटील, युवा उद्योजक आणि ओमकार बर्ड प्रुफिंग प्रा. लि. मुंबईचे अध्यक्ष संजय चव्हाण, गुंतवणूक सल्लागार अनिल चव्हाण, दै. रत्नागिरी टाईम्स सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख लक्ष्मीकांत भावे, भगीरथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश भोईर, उद्योजक गणेश जाधव, डॉ प्रदिप बांबडेकर,सुजित जाधव उपस्थित होते.
दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील समाजबांधव यांना सात मानाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते यावर्षी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याप्रित्यर्थ तसेच वैमानिक क्षेत्रात पीएचडी करून सहाय्यक व्यवस्थापक या पदावर झारखंड येथे कार्यरत असलेले प्रभात दत्तकुमार फोंडेकर यांना तसेच एमपीएससी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जलसंपदा विभागात सहायक अभियंतापदी रुजू झालेले स्वप्निल अरुण होडावडेकर यांना संत रोहिदास शिक्षणरत्न पुरस्कार देऊन तर सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्त्या रजनी शिंदे यांना रोहिदास समाजरत्न पुरस्कार, सहकार क्षेत्रातील पुरस्कार युवा उद्योजक संजय चव्हाण आणि तुषार विष्णू चव्हाण यांना रोहिदास सहकाररत्न देण्यात आला तर साहित्य क्षेत्रातील पुरस्कार वरवडे येथील लेखिका सरीता पवार यांना रोहिदास साहित्यरत्न, आणि सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कार तेंडोली येथील सुपुत्र प्रशांत तेंडोलकर रोहिदास सांस्कृतिकरत्न पुरस्कार २०२३ देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी समाजामधील गटई कामगार, सरपंच, सदस्य, सेवानिवृत्त, गुणवंत विद्यार्थी यांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केल्याप्रित्यर्थ राधानगरी उपसभापती रवीश पाटील, राज्याध्यक्ष संजय कदम, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन लोकरे, संचालक आणि कोकण विभाग अध्यक्ष प्रा. भिकाजी नेरकर, सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण यांचा विशेष गौरव करण्यात आला.
सांगली येथील साहित्यीक आणि व्याख्याते डॉ रविंद्र श्रावस्ती यांनी संत रोहिदास यांच्या जीवनचरित्र विविध उदाहरणे आणि दाखले देऊन विषद केले.
समाजावर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकट किंवा अन्याय अत्याचार झाल्यास त्या वेक्तीच्या आणि कुटुंबियांच्या पाठीशी संस्था ठाम राहिली असून गेल्या चार वर्षांपासून संस्थेचा लेखाजोखा प्रास्ताविकेतून संस्थेचे राज्यसरचिटणीस प्रसाद मसुरकर यांनी मांडले.
संस्थेचा पाचवा वर्धापन दिन सोहळा हा मुंबईत साजरा केला जाईल आणि त्याची जबाबदारी राज्य संचालक आणि ठाणे, रायगड, मुंबई, पालघर जिल्हा पदाधिकारी आणि समाजबांधव घेतील असे प्रतिपादन संस्थेचे संचालक आणि कोकण विभाग अध्यक्ष प्रा. भिकाजी नेरकर यांनी केले. राधानगरी तालुका उपसभापती यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून संस्थेने यापुढे देखील असेच सर्वसमावेशक काम करण्याचा संदेश दिला.युवा उद्योजक संजय चव्हाण यांनी संस्थेच्या माध्यमातून समाजातील प्रामाणिकपणे काम करण्याऱ्या समाजबांधव यांना मानाचा समाजरत्न हे पुरस्कार वाढवावेत जेणे करुन निस्वार्थी वृत्तीने काम करणाऱ्या बांधवांना प्रोत्साहन मिळेल. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख लक्ष्मीकांत भावे यांनी संस्थेचा इतिहास मी पाहत असून ज्या पद्धतीने संस्था कार्यरत आहे त्यानुसार संस्था लवकरच राज्यपातळीवर नावाजलेली होईल असे गौरवोद्गार काढले. यावेळी अनिल चव्हाण, गणेश जाधव, सुजित जाधव, शिक्षणरत्न पुरस्कार विजेते स्वप्निल होडावडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर कोकण विभाग सचिव सुभाष कसालकर, सी आर चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन लोकरे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विलास बांबर्देकर, सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष दत्तकुमार फोंडेकर, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, संतोष पावसकर, दर्शन कुडाळकर, समीर बिबवणेकर, कणकवली तालुका अध्यक्ष मयूर चव्हाण, कुडाळ तालुका अध्यक्ष गुरू तेंडोलकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष अनिल कालेलकर सर, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष अनंत कोळसुलकर, सचिव प्रकाश जाधव , प्रकाश वाघेरकर, राजेंद्र चव्हाण, प्रकाश चव्हाण, प्रशासनीय अधिकारी अनिल चव्हाण आदी पदाधिकारी तसेच बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक राज्यसरचिटणीस प्रसाद मसुरकर सर, सूत्रसंचालन सिंधुदुर्ग जिल्हा ऊपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण तर आभार प्रदर्शन सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष दत्तकुमार फोंडेकर यांनी मांडले.
