डेगवे मोयझरवाडीत गव्यारेडयांकडून नुकसान

वनविभागाने बंदोबस्त करण्याची माजी उपसरपंच मधुकर देसाईंची मागणी

बांदा/प्रतिनिधी
डेगवे-मोयझरवाडी येथे गव्यारेड्यानी येथील शेतकऱ्यांच्या सुपारी, केळी व काजू बागायतीची नासधूस केल्यास ऐन हंगामात शेतकऱ्यांचे सुमारे एक लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी माजी उपसरपंच मधुकर देसाई यांनी केली आहे.
डेगवे हा बागायतीने समृद्ध गाव असून याठिकाणी वन्य प्राण्यांकडून नुकसानीचे सत्र हे सुरूच असते. काही दिवसांपूर्वी जंगली गव्या रेड्यांचा कळप याठिकाणी स्थिरावला असून या कळपाकडून बागायतीचे नुकसान होत आहे.
येथील शेतकरी मधुकर देसाई, राजन देसाई, उत्तम देसाई यांची सुपारी, केळी व काजू कलमे गव्यांनी मोडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वनखाते केवळ नुकसानीचे पंचनामे करते, मात्र भरपाई मिळत नसल्याने निदान वनखात्याने गव्यांचा तरी बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

You cannot copy content of this page